Press "Enter" to skip to content

मंगल नाम

मंगल नाम

गाता यावे मंगल नाम
सुर लागू दे ताल मिळू दे
दूर सरूदे काम धाम

विजय कारक नाम तुझे हे
अघनाशक दुरित जाळते
घेता नाम मिळते आम्हा कैवल्याचे धाम

कोटी कोटी प्रकाश किरणे
उजळतील नव पंचप्राणे
देहदीप पंचारती झाला गाते सुखमय नाम

पतितपावन जागृत नामी
तरले उद्धरिले अज्ञानी
मिळते मुक्ती शाश्वत स्फूर्ती पूर्ण सुखाचे धाम

हरिहरब्रह्मा एकचि आता
भेद न उरला तूचि त्राता
जागृती झाली मनमनी माझ्या स्फुरले मधुमय गान

सुजाता खरे, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.