मायबोली
माझी मायबोली गोड
ज्ञानोबांची, तुकयाची
अमृताते पैजा जिंकी
जनाईच्या अभंगाची
ज्ञानदेवे सांगितले
मराठीत गीता सार
एकनाथी भागवत
कीर्तनात गोडी फार
माय ओवीतून गाते
पीठ पडे भरभर
गाई पोवाडा शाहीर
थाप मारी डफावर
बहिणाई साधी सांगे
तत्त्वज्ञान जीवनाचे
सावरकरांचे महा
देशप्रेम कवनाचे
काना सोबत बाजुला
मात्रा शोभे तिला वर
लेई उकार वेलांटी
अनुस्वार भाळावर
भाषा मराठी समृद्ध
गाणी गाते गोड गोड
साहित्याने नटलेली
नाही तिला जगी तोड
सौ. विजया चिंचोळी
खारघर, नवी मुंबई.







Be First to Comment