Press "Enter" to skip to content

गणितामधुनी जीवन फुलते

गणितामधुनी जीवन फुलते

रहस्य विश्वाचे उलगडते
गणितामधुनी जीवन फुलते ||ध्रु.||

नित्याच्या व्यवहारासाठी
प्रश्न उभा हा ‘किती?’ समोरी
करावया मग उकल तयाची
सदा करावी लागे गणती
संख्यांमधुनी उत्तर मिळते
गणितामधुनी जीवन फुलते

बाजारातुन येता, जाता धान्य,

वस्त्र इत्यादी घेता

खाऊ औषध भाजी असो वा
पैशाचा तर चाले सौदा

जमा-खर्च संख्यांशी नाते

गणितामधुनी जीवन फुलत

रेलगाडी, मोटार असो वा
जहाज असु द्या विमान सेवा
वेळापत्रक होय तयांचे
करण्या गणितचि करते सेवा
मानवी कृती त्यावर ठरते
गणितामधुनी जीवन फुलते

वैज्ञानिक कुणि हो संशोधक

तंत्रज्ञ असो, शल्यचिकित्सक

ज्योतिर्विद, मानवी संगणक

गणित विषय सर्वांचा चालक
सर्वांचे बल यातच वसते
गणितामधुनी जीवन फुलते

गती ग्रहांच्या, गति ताऱ्यांच्या
अणु-रेणूतिल सूक्ष्म कणांच्या
अवकाशातुन फिरती याने
संचालन केले गणिताने
प्रगतीच्या पायाशी वसते
गणितामधुनी जीवन फुलते

मनोहर काजरेकर, कुडाळ, सिंधुदुर्ग

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.