Press "Enter" to skip to content

स्त्री शक्ती

स्त्री शक्ती

डोळ्यां मधुन बोलणारे तुझे रुप किती लोभस ग…
न थकता बोलणारे तुझे शब्द देती सतत साथ ग…
स्वप्न दाखवी उद्याची मन तुझे विशाल ग…
लिलया पेलते जबाबदा-या कष्ट सोसते अपार ग…
दमलेल्या थकलेल्या जीवास तुच देई उभारी ग…
मुलांचे संगोपन करतांना कर्तव्यास नाही चूकत ग…
आजारपणात सर्वांच्या कशा रात्री जागतेस ग…
थोड्या श्रमाने थकतो आम्ही कुठुन आणतेस बळ ग…
पत्नी,सखी,बहीण,आई रुपे तुझी हजार ग…
राधा,चंडिका,दूर्गा,पार्वती,आदीशक्ती ही तूच ग…
प्रत्येक रुपे वंदावी असा महिमा तुझा अगाध ग…
उमगले आज मला स्त्री तू का महान ग…

दिलीप आचार्य,
कवाई (राजस्थान)

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.