प्रकाश ज्ञानाचा
उजळो जगात,
अज्ञान नकोसे
नकोच मनात.
निराशेला आता
नको मुळी थारा,
चैतन्याचा वाहो
सुखेनैव वारा.
आळसा पळवू
प्राधान्य कष्टास,
श्रमाचेच मोल
येतसे फळास.
स्वयंपूर्ण होऊ
पाळून नियम,
राखू या अंतर
ठेवून संयम.
आशेचे दीपक
घेऊनिया हाती,
तेवत रहाती
आनंदाच्या ज्योती.
आनंदाने करु
दिव्यांचे पूजन,
दीप अमावास्या
दिव्यांना वंदन.
अपर्णा सतीश साठे
नवीन पनवेल.






Be First to Comment