निसर्गवेध
डोंगराच्या कुशीतून वाहे धबधबा
वाटे जणू येती फेसाळत दुग्धधारा
तुषारांचे शिंतोडे उडती अंगावर
उठती रोमांच तन-मनावर
निसर्ग दुनियेची किमयाच न्यारी
दु:खातही मुखावर हास्यरेषा उमटवी
मनाची मरगळ दूर पळवून लावी
वाटे मनाला नाचावे बालका परी
जलधारांच्या संगतीनेमनसोक्त भिजावे
बालपणीचे दिवस आनंदाने जगावे
सख्या-सोबत्यांसंगे बेधुंद होऊन खेळावे
अन् लहानाहुनि लहान होउन जावे
काळ्या कातळ खडकावर बैसूनी
वाहत्या पाण्याची मजा लुटावी
आसपासचा निसर्ग येई बहरूनी
नजर न हटे त्या सौंदर्यावरूनी
हिरवे डोंगर अन् हिरवी वनराई
मध्येच रंगीबेरंगी फुलांची रांगोळी
त्यावर सुंदर फुलपाखरे भिरभिरती
वार्यासंगे मंद गंध मोहवूनी जाई.
नयना पेंढारकर, नवीन पनवेल







Be First to Comment