Press "Enter" to skip to content

कविश्री अरुण दत्ताराम म्हात्रे यांची कविता : सु-संस्कारांचे गुरु

सिटी बेल लाइव्ह : काव्य कट्टा


सु-संस्कारांचे गुरु

माझे गुरु आजी-आजोबा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी कष्टाने केला संसार उभा...१.

गुरुस्थानी पुजतो बाबांना सत्त्य मार्गांची त्यांची शिकवण सतत जपले आम्हा मुलांना...२.

आई माझी गुरु माऊली चुकता सावरले, मायेने वाढविले तप्त-उन्हातील 'गार-साऊली'...३.

बाबा-आई आजोबा-आजी 'सु-संस्कारांचे' सरिता-सागर तेच प्रेरणा, स्फूर्ती माझी...४.

मनास माझ्या गुरु मानतो आरशा सारखे कार्य मनाचे चूक-बरोबर तोच सांगतो...५.

©® कविश्री- अरुण दत्ताराम म्हात्रे. नवी मुंबई, मो.- 9987992519.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.