रंगीत पान
माझ्या मनात त्याचे रंगीत पान आहे
जेथे विहारते मी त्याचेच रान आहे
एकांत माळताना गंधाळते कितीदा
हे सौख्य एकटीचे तेजाळते कितीदा
नात्यातल्या सुखाचे गातेय गान आहे
नादात उंब-याच्या ओलांडले मला रे
पाहून स्वप्न त्याचे साकारले मला रे
वेड्या तुझ्यामुळे बघ माझीच शान आहे
सांगे तुझी हजेरी वारा उगाच हसतो
तो गंध ओळखीचा मागे हळूच लपतो
झाले मुकी मुकी मी ,ना देहभान आहेस्मिता गांधी, पनवेल







Be First to Comment