Press "Enter" to skip to content

राज्यकर्त्यांचे हे असेच असते

राज्यकर्त्यांचे हे असेच असते

गरीबांना काठी
अन् श्रीमंतांना मिठी
राज्यकर्त्यांचे हे असेच असते….

गरीबांना आंबलेला श्रीखंड
अन् श्रीमंतांना मोक्याचा भुखंड
राज्यकर्त्यांचे हे असेच असते….

गरीबांना मिळतो नाहक दंड
अन् श्रीमंतांवरील मात्र कारवाईत खंड
राज्यकर्त्यांचे हे असेच असते….

गरीबांना अर्जावर अर्ज
अन् श्रीमंतांना भरमसाठ कर्ज
राज्यकर्त्यांचे हे असेच असते…

गरिबांच्यापाठी करवसुलीचा ताप
अन् श्रीमंतांचा होतो कर माफ
राज्यकर्त्यांचे हे असेच असते…

गरिबांकडे मिळते फक्त मत
अन् श्रीमंतांकडून मात्र सुधारते पत
राज्यकर्त्यांचे हे असेच असते….

चित्र जसे वरून दिसते तसे ते नसते
जनता मात्र या भुलभूलैयात फसते
राज्यकर्त्यांचे हे असेच असते…

संदिप तांबे, माहिम, मुंबई

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.