Press "Enter" to skip to content

मातृभाषेचा नंदादिप

मातृभाषेचा नंदादिप

मालवू नका दीप तुम्ही काजळले जग
अंधारातही द्या हात उजाडेल मग
संस्कृती करण्या जतन माझी तगमग
सारासार विचार करा मना लगबग
नका कधीही पुसू काही श्रेष्ठ संत महंत नामावली
सुवर्ण अक्षरांनी लिहिलेल्या ऐतिहासिक नावली
क्षणार्धात स्तब्ध दुनिया कशी
विसरू नको रे वेड्या जुने सोनं बावनकशी वेड लावलं ऋषी-मुनी संत सर्वजण
आता आली वेळ तुझे खरे वैभव जगास झाकळून टाक इंग्रजीचे बाजारीकरण.
माय मराठी तर वाघिणीचे दूध हा रुबाब अमृतातेही पैजा जिंके असा माय मराठीचा जबाब
असं मन आसव शब्द भावभावनांचे आकाश ओथांबती
मानूया मराठीची अशी अशी अनमोल कीर्ती
मी मराठी माय माऊली जपूया तिजप्रति प्रीती
मनी मातृभाषेचे हे नंदादीप तेवती पूर्णिमा शिंदे, मुंबई

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.