Press "Enter" to skip to content

माय मराठी

माय मराठी

तूच निर्मिशी नव साहित्यिक
तुझी स्पंदने रोजच ओठी ।
नसे दिवस आजचा फक्त ही
तूच आमुची माय मराठी ॥

कितीक येवुन गेल्या तरिही
तुलाच धरती येथे पोटी ।
तुझी लेकरे आम्हीच सारी
तूच आमुची माय मराठी ॥

किती मने ती तुझ्यामुळेही
बंधच येथे किती जोडती ।
मनामनातुन दरवळणारी
तूच आमुची माय मराठी ॥

सात समुद्रा पल्याडही तु
येती बांधव तुझ्याच भेटी ।
तिथेही झेंडा फडकत राही
अशी आमुची माय मराठी

-© केदार जोशी, पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.