Press "Enter" to skip to content

सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा : तुझ्याविना …..

तुझ्याविना …..

काहीच कसे वाटत नाही,
सोडून मला जाताना…
काळीज माझं तुटतंय,
निरोप तुझा घेताना…

शेवटच्या भेटीचा,
निरोप मी घेत आहे…
डोळ्यांतून अश्रू,
घळघळा वाहत आहे…

प्रेमाचा हक्क ,
मी कधी सांगणार नाही .,,
गेला जरी जीव माझा,
तुला कधीच कळणार नाही …

वाट मी रोज पाहीन,
तू कधी येणार नाहीस…
सरले सारे आयुष्य तरी,
वाट पाहणे सोडणार नाही …

एक होता मार्ग आपला ,
आता एक होणे नाही ..
आठवण तू करू नकोस ,
मी कधीच विसरणार नाही …

आयुष्यातील पहिले प्रेम ,
विसरतो का कुणी ?…
तुझ्याविना जगण्यासाठी ,
पु-या आहेत आठवणी

अजय शिवकर
केळवणे पनवेल
७९७७९५०४६४

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.