डॉलरचा देश
सेव्ह डॉलर सकाळी सेव्ह डॉलर संध्याकाळी
सतत जाहिरातबाजी जंक मेलची त-हाच आगळी
पैसा मिळतो तेवढा दहा दहा वाटांनी वाहतो
क्रेडिट डेबिट कार्डाच्या मोहजालात फसतो
हिशोब सगळा आठवड्याचा दूध दही ताकासह
ज्यूस आइस्क्रीम तोंडीलावणे गरम शिळ्या अन्नासह
सोयी सगळ्या आधुनिक सोफे असती चकचकीत
आपणच राजे आपणच नोकर सगळे कसे सुटसुटीत
त्यांच्या आलिशान गाड्या जणु दारापुढची पंगत
मोठ मोठ्या बागा आणि फुलांची रंगत-संगत
रस्ते मोठे सरळसोट वाहने गर्कन
वळत पळत
जीव धडधडला तरी मात्र पोटातील पाणी नाही हालत
तिथला प्रत्येक माणूस स्वतंत्र अलिप्ततेची शान
सर्व जगात हा देश मिरवतो वडिलकीचा मान
स्वच्छता शिस्त शिक्षण धनलक्ष्मी मिळते खास
भुलती आकर्षती दूर दूर देशीचे विद्यार्थी त्यास
तिथे जावे ज्ञान घ्यावे उच्चविद्याविभूषित व्हावे
मात्र स्वच्छतेचे स्वावलंबनाचे धडे मायदेशीही रुजवावे
सुजाता खरे, नवीन पनवेल







Be First to Comment