शिवबा
माझीया अंगणी | शिवबा खेळतो|
धडे गिरवीतो | स्वराज्याचे ||
ढाल तलवार | काठी दांडपट्टा |
तरबेज पठ्ठा | झाला की रे ||
केला श्रीगणेशा | गनिमी काव्याचा |
अभ्यास भूमीचा |नकाशाने ||
किल्ल्यासभोवती | घोडदौड केली |
दऱ्याखोरी झाली | तोंड पाठ ||
मित्रांच्या अंगणी |चटणी-भाकर |
खाई भूमीवर | बैसोनिया ||
मराठा मावळा | जीवास उदार |
राजास आधार | किती मोठा ||
स्वराज्याचा राजा | मर्द मराठ्यांचा |
पुत्र भवानीचा | शिवबाळ ||
…सौ. स्वाती लेले, नवीन पनवेल







खूप छान लिहिलंय