Press "Enter" to skip to content

गणिताचे जयगान

|| गणिताचे जयगान ||

हिंदुभूमिचे सुपुत्र आम्ही
मनी धरू अभिमान ||
एकमुखाने गाऊ सारे
गणिताचे जयगान ||ध्रु ||

आर्यभट्ट भास्कराचार्य ते
वराहमिहिर ब्रह्मगुप्त ते ||
रामानुजनहि देति जगाला
एक नवे आह्वान ||१||

शून्य, एक ते आठ, नऊ खरे
दशमानाचे घटकचि सारे ||
भारतीयांचे या विश्वाला
असे नवे वरदान ||२||

योग-वियोग, गुणन-भाजन या
मूलभूत आहेत प्रक्रिया ||
स्वामी होऊन या सर्वांचे
उभवू अपुली शान ||३||

गणितामधल्या गमती जमती
काळवेळ विसरुनी रंगती ||
का घाबरता उगा त्याकडे
वळवा अपुले ध्यान ||४||

गणितामधुनी जीवन फुलते
प्रगतीचे मग पाऊल पडते ||
मानवनिर्मित शास्त्र परी
त्या अग्रपूजेचा मान ||५||

मनोहर काजरेकर, कुडाळ, सिंधुदुर्ग

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.