Press "Enter" to skip to content

मैत्रीणी…

मैत्रीणी…

माझ्या मैत्रिणी म्हणजे
रंगीबेरंगी फुलांचा गुच्छ
नाजुक, सुंदर व
मनाने स्वच्छ…
माझ्या मैत्रिणी म्हणजे,
जणु वाहता निर्झर..
खळाळत पुढे जाणार्या..
नाही कोणावर निर्भर.
माझ्या मैत्रिणी म्हणजे
भक्तीने फुललेला मळा,
भजन गातात रंगून ,
सर्वांचा गोड मधुर गळा..
माझ्या मैत्रिणी म्हणजे
सप्तरंगी इंद्रधनु
नवरात्रात अशा सजतात ,
स्वर्गीच्या अप्सरा जणु..
माझ्या मैत्रिणी म्हणजे
ऊत्साहाचे कारंजे..
सगळ्यांचे वाढदिवस
साजरे करतात थाटामाटाने..
अशा गोड मैत्रिणी लाभल्या पूर्वजन्मीच्या
पुण्याईने..
लवकर भेटीचा योग
येवो देवा, तुझ्या कृपेने

विजया करंडे, प्रिन्सटन, (अमेरिका)

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.