Press "Enter" to skip to content

कविश्री अरुण दत्ताराम म्हात्रे यांची कविता
मंगलमूर्ती मोरया…..

सिटी बेल लाइव्ह । काव्य कट्टा ।

मंगलमूर्ती...मोरया !

शुभ कार्यात, शुभ प्रसंगी

तुझीच पुजा केली जाते

भक्तीभावाने श्रद्धा पूर्ण

'श्रीगणेशा' ने सुरुवात होते..१.

शंकर-पार्वती पुत्र गणेश तू

एकदंताय वक्रतुण्डाय तू

सुख देणारा, दुःख हरवणारा

मंगलमूर्ती बाप्पा मोरया तू...२.

हे गजानना वरदविनायक

तुला आवडती लाडू-मोदक

हे गणपती करता तुझी आरती

वातावरण होई अल्हाददायक...३.

मखर शोभते तुजमुळे बाप्पा

येता घरी तू पसरे चैतन्य

चेहऱ्यावर सर्वांच्या नूर आगळा

तुला पाहताच वाटते धन्य...४.

काय मागावे गणेशा तुजकडे

तू अंतर्यामी करता - करविता

नि:स्वार्थी बुद्धी द्यावी सर्वांना

वंदन तुला हे भाग्यविधाता...५.

©® कविश्री- अरुण दत्ताराम म्हात्रे. नवी मुंबई, 9987992519.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.