Press "Enter" to skip to content

नवा संकल्प….

नवा संकल्प….

सये… तेजस्वी व्हायचं ,
एक नवं धनुष्य पेलायचं,
एक नव स्वप्न
आकाशी झुलायचं,
स्त्रीस्वातंत्र्याचं दव प्यायचं,

सये उत्तुंग भरारी मारायचं,
एक सत्य नजरेत घेरायचं, अस्तित्वाला साजेसं करायचं, कर्तृत्वाचे माप भरायचं,
एक साहस नजरेत वाचायचं,
समान संधीचा सुरात नाचायचं, अन्याय-अत्याचार सारं फुकायचं

सये सक्षमतेने जग जिंकायचं , स्वसामर्थ्याने तेजस्वी व्हायचं, क्षितिजावर स्वच्छंदी
बागडायचं ,
निळ्याशार नभी स्वैर उडायचं,

सयानो ध्येय मनी धरायचं,
आता वाचल्याने सारे विश्व आपलंसं करायचं,
सये…. तेजस्वी व्हायचं
तेजस्वी व्हायचं

पूर्णिमा शिंदे, मुंबई

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.