सिटी बेल लाइव्ह । काव्य कट्टा ।
= वचनपूर्ती =
दिला शब्द म्हणजे वचन
रेघ काळ्या दगडावरची
असतो पक्का वादाच तो
कसोटी ती पाळणाऱ्याची…
वचन देणे असते सोपे
मात्र पाळणे ते कठीण
म्हणून शब्द देण्यापूर्वी
करावा विचार परिपूर्ण…
भावनेच्या भरात ही वचने
देतांना कुणी सहज देतात
दिली वचने तोडल्यामुळे
रंगली स्वप्ने भंग पावतात…
वचन पाळणे कर्तव्यच
ते निभावण्यावर ठेवावे ध्यान
पाळण्यातही असे आनंद
पूर्ण करावे दिले वचन...
पूर्ण करावे दिले वचन... !!
©®कविश्री- अरुण दत्ताराम म्हात्रे.
नवी मुंबई, मो. 9987992519.







Be First to Comment