सिटीबेल लाइव्ह / काव्यकट्टा
तुझे माझे करता करता
कोणी नसे कोणाचा |
कोरोनाने दाखवून दिले
कोण झुठा कोण सच्चा ||
होमकाँरनटाईन वाल्यांकडे
संशयाने बघतात |
आपलेपणा विसरूनी
परकेपणाने वागतात ||
संशयाचे हे भूत
बसले कसे माथी |
कोरोनाने विसरूनी गेले
खरी नाती गोती ||
मनातील मलभ
दूर सारूनी रहा अँक्टीव्ह |
संशयाने अवती भवती
दिसू लागले सारे पाँझिटिव्ह ||
कोरोना आला तसा
पुढे निघूनही जाईल |
तुटलेली ती मनं
परत कशानं सांधतील ? ||
कवी-श्री.नंदकुमार मरवडे, श्री.क्षेत्र तळवली तर्फे अष्टमी, ता.रोहे,जि.रायगड.






Be First to Comment