Press "Enter" to skip to content

आठव

आठव

तुझा आठव आठव
असे भरला मनात
पडे पाउस स्वप्नांचा
तुझ्या माझ्या अंगणात

तुझ्या माझ्या अंगणात
फुले फूलती मोगरा
देही फुलला वसंत
क्षण लाजरा लाजरा

क्षण लाजरा लाजरा
मग डोळा दाटे पाणी
काशी क़ाय आपसूक
येती ओठांवर गाणी

येती ओठांवर गाणी
आणि सांज ही भरली
लख्ख दीप उजळले
आणि नीशा सजलेली

ऍड.सायली सचिन गोखले, पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.