मन अथांग अथांग
मन अथांग अथांग
आहे सागरा समान
अंत लागेना तयाचा
खोल आहे ग कुठवर?
मोती जैसा शिंपल्यात
वात्सल्य तैसे उरात
माणुसकीने वागता
प्रेम दिसे गं साक्षात
प्रवाळ खोल तळात
सद्गुण तैसे माणसात
समृद्ध करून सोडतं
जेव्हां येते वागण्यात
कासव गुणाचे प्रतिक
वसे निळ्या समुद्रात
त्याच्या सारखे गं गुण
आणावे आचरणात
अविरत लय ती लाटात
विचाराचे अवर्तन मनात
वाटे सौंदर्य याचे मर्यादेत
नसता रूपांतर वादळात
संगीता देशपांडे, नवीन पनवेल






Be First to Comment