तो…
तो असतो एकदम सरळ
सरळ सरळ म्हणजे किती?
तर अगदी जिलबी सारखा…
पाकीट, रुमाल, चावी
सगळं लागतं हातात…
रोज नवीन पदार्थ केला तरी विचारतो
आज तरी वेगळं आहे का डब्यात?
डबे, आवराआवरी, मुलांचं करून
ती वेळेवर निघते..
फक्त स्वतःचे आवरून सुध्दा
त्याची मात्र लोकल चुकते..
ती चा वाढदिवसाच्या, लग्नाची Anniversary
तो हमखास विसरतो…
तुला लक्षात आहे का हे पाहात होतो
म्हणत वेळ मारून नेतो…
टीव्ही वरच्या मालिकांवरून
रोज तिची चेष्टा करतो
Cricket fever सुरू होताच
दिवसेंदिवस टिव्ही समोर बसतो
देश विदेश सायन्स टेक्नाॅलाॅजी
सगळ्यात तो update…
घरचे काम सांगितल्यावर मात्र
हमखास विसरण्याची mistake..
बायकोला माहेरी धाडताना
खूष असल्याचे दाखवतो…
पण ती घरी नाही म्हणून
उगी घराबाहेर रेंगाळतो…
ती ला काही झाल्यावर
अगदीच सैरभैर होतो..
माझं मी पाहीन म्हणणारा
तिच्याजवळ बसून राहतो..
तो असतो हळवा
पण दाखवतो स्वतः ला कणखर..
लेकीचे लग्न ठरल्यावर
रडत राहतो उशीभर…
वरदा जोशी, नवीन पनवेल







Be First to Comment