Press "Enter" to skip to content

असे काही घडले

असे काही घडले

असे काही घडले कळले नाही.
आज मन माझे रमून गेले.
मन माझे कसे धुंद जाहले……..

आयुष्य हवे-हवेसे वाटू लागले.
असे काही घडले कळले नाही.
मन माझे कसे धुंद जाहले……….

नितळ पाण्याच्या डबक्यापेक्षा
खळ-खळणा-या झ-यासारख
व्हावेसे वाटू लागले.
असे काही घडले कळले नाही.
मन माझे कसे धुंद जाहले……….

क्षीण उतरला, त्रास सरला
चल परत शुभारंभ करुया
येणा-या या नववर्ष नवचैतन्याचा
असे काही घडले कळले नाही.
मन माझे कसे धुंद जाहले……….

महेश प्र.पाटील, मानखुर्द.
मुंबई

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.