!!कोरोनाची महामारी !!
जगभरात फैलावलेला हा आजार,
मोकळा करून टाकला याने संपूर्ण बाजार,
प्रत्येक जिल्ह्यात मृत्यूची संख्या झालेय हजार !
लॉकडाऊन हे वाढलं लाखो मजूर झाले बेरोजगार,
तरी कोणी सोडू नका धीर ,
सगळं काही करायला स्थिर,
सज्ज आहे आपलं सरकार.
सगळ्या नागरिकांनी आता सुरक्षित अंतर ठेवा ,
संपूर्ण जगाला वाटेल आपला हेवा,
चार महिन्यांनी का होईना खावासा वाटेल मेवा.
जाऊ नका कोणी आता घराच्या बाहेर,
गेलात,तर कोरोना उभा आहे हातात घेऊन आहेर .
काम-धंद्यासाठी म्हणून लोकं गेली शहराकडे,
पण आला हा कोरोना आणि आठवले सगळ्यांना आपले माहेर !
काम बंद झाल्यामुळे कामगार घरीच बसले,
मुलांसोबत गेम्स खेळून घरात पण रमले !
कोरोनाला घाबरून मानू नका कोणी हार,
पोलीस आहेत दांडके घेऊन करायला कोरोनाला हद्दपार !
टीव्हीमध्ये बातम्या ऐकतो
सोशल डिस्टंसिंग चा उडाला फज्जा,
घरातपण बसता येत नाही
वाटायला हवी थोडी लज्जा !
डॉक्टर – नर्सेस हॉस्पिटलमध्ये काम करतायेत घरदार सोडून,
दारुड्यांचा काय वेगळच चाललंय,
ते तिकडे मजा करतायेत दुकाने फोडून !
रस्त्यावर गर्दी करून करू नका घोळका,
कोरोना किती महाविषाणू आहे हे आतातरी ओळखा !
स्वच्छ धुवा हात,
हसू नका काढून दात,
कधीही येईल कोरोना आणि करून जाईल घात !
लक्षपूर्वक ऐका मा. मोदींची “मन की बात”
सॅनीटायझर लावल्याशिवाय बाहेरच्या वस्तूंना लावू नका हात .
नऊ महिने घरात बसून झालेत सगळे बोअर,
चिंता कसली करू नका उघडा घराचे डोअर,
बाहेरचं सुंदर जग पाहण्याकरिता आणा अंगात जोअर (जोर) 😀
घरात बसून बसून आलेय वेड लागण्याची पाळी,
घरात बसूनच गेली होळी अन् घरात बसूनच दिवाळी !
मोबाईल वरच क्लासेस अन् मोबाईल वरच शाळा,
पहिल्यांदाच मुलांना आलाय मोबाईलच कंटाळा !
घरात बसण्याचे दिवस संपले बाहेर आता पडा,
सरकारने घातलेले नियम पाळून कोरोनालाच नडा !
देवाकडे आता फक्त एकच साकडं,
अशी एखादी लस आण,
की करोना करू शकणार नाही काही वाकडं !
दर्शन महेश मंजीरी जोशी, पनवेल, इयत्ता- दहावी







Be First to Comment