🎇 त्रिपुरारी पौर्णिमा 🎇
तुलसी विवाह शुभ मुहूर्त
कार्तिक मासी शुभ दिनी
कृष्णमय ती वृंदा पावन
डवरली हिरव्या पानोपानी
देवशयनी तून प्रबोधिनी
झाली चातुर्मास सांगता
तमातून तेज प्रकाशी
आली नव पर्वणी आता
आभाळीचे लक्ष दीप
झाले प्रकाशित भूवरी
देऊळे राऊळे महाद्वारी
अवतरे पौर्णिमा त्रिपुरारी
पायरी पायरी लखलखती
दीपमाळ शिखरे तेजाने
दिव्य चमचमत्या पर्वाची
त्रिपुरारी पौर्णिमा चैतन्याने
पूर्ण चांदवा चंदेरी किरणे
शीतल प्रकाश होऊ या
तम सरू दे नाश होऊ दे
ज्योत ज्योत जागवू या
मनामनांतील काळोख
पुसून टाकूया त्वेषाने
नवी उभारी नवी जागृती
पुलकित होऊ दे तने मने
सुजाता खरे, नवीन पनवेल







Be First to Comment