सिटी बेल लाइव्ह / काव्य कट्टा
।। समाधान ।।
जगात सर्व दान श्रेष्ठ आहेत
अन्नदान रक्तदान नि नेत्रदान
या सर्वांहून एक श्रेष्ठ आहे
ते म्हणजे मनाचे समाधान
कितीही संपत्ती मिळत राहो
अजून मिळविण्याची लालसा
यासाठी खालच्या थराला जाणे
कधी सोडशील रे माणसा ?
जीवनात मिळाली सुख समृद्धी
तरी ही नेहमी चेहरा असे रडका
सारा पैसा माझ्याजवळ असावा
विचार ठेवी नेहमी असे सडका
आहे तितक्यातच राहा सुखी
जाणून घे जीवनाचा मूलमंत्र
शरीरातून एकदा गेला आत्मा
चालत नाही मग कोणतेच यंत्र
त्यांचेच नाव होते अजरामर
जो जगतो सदा दुसऱ्यासाठी
प्रत्येक गोष्टीत शोध समाधान
सुखी जीवन आहे तुझ्यासाठी
- नागोराव सा. येवतीकर,
धर्माबाद जि. नांदेड
9423625769






Be First to Comment