Ask for Mask
कोरोनाची येत आहे लाट
विना मास्क फिरताच
होईल जीवनाचा घात ||
सोम ते रवि दिवस आहेत सात
विना मास्क बाहेर पडाल
तर आहे कोरोनाशी गाठ ||
ताई माई काका नाना
एक बात अवश्य माना
मास्क न घालण्याचा करु नका कोणताच बहाणा ||
नका देऊ कोरोनास पाहुणचार माणसे घरी जमवून चार
कच्याबच्यांसह जगायचेत
दिवस सुखाचे अजून चार ||
आपण गड्या जगात लई भारी
फुकाचा विश्वास नेई मृत्यु दारी
सांगू नाही शकत बाबा रे कोणावर कधी येईल ही बारी ||
लक्षणे दिसतास खास
ताप, खोकला, कठीण होतो घ्यायला श्वास
घरात ठेवा ऑक्सिमिटर हमखास खास ||
लपवून ठेवू नका संसर्गाची बात
वेळीच उपचार करुन,
द्या कोरोनास कायमची काट
नका देऊ कोरोनाला
घरी आमंत्रणाचा पाट ||
कोरोना झाला म्हणजे नाही काही सर्व संपले
विलगीकरणात उपचार घ्या अन् वेचा सुखी संसारातील मोती शंख शिंपले ||
मी घातला आहे मास्क
मित्रा तू पण घाल रे मास्क
हीच तर आहे चळवळ आपुली Ask for Mask ची खास ||
रुग्णमित्र प्रसाद अग्निहोत्री, नवी मुंबई







Be First to Comment