सांज साजिरी..
अशी असावी सांज साजिरी, असा असावा वारा
समीप असा तू माझ्या आणि, धुंद आसमंत सारा
अवखळ एक लाट किनारी, चिंब भिजवी धरा
एक किल्ला स्वप्नांचा तो, कवेत घेती सारा
झुळूक गार वा-याची अशी, मनास स्पर्शून गेली
एक लकेर आनंदाची, अंतरंगात झंकारली
पाऊलखुणा तुझ्या नी माझ्या, ओल्या वाळूत उमटल्या
क्षितीजापार दूरवर दिसती, दोन अशा सावल्या
चंद्रासमवेत तारकांनी, सुंदर सजले अंबर
दूर किनारी चालावे मी, तुझ्यासवे निरंतर
सुजाता कुलकर्णी, आदई







Be First to Comment