“तू”
तू कुठे दिसत नाही
मी कुठे तुला शोधत नाही
प्राजक्ताचा टवटवीतपणा तू
दारातली काढलेली रांगोळी तू
गुलाबाचा सुगंध तू
मोगर्याचा गजरा तू
सोनचाफ्याचा रंग तू
जाईजुईचा नाजूकपणा तू
नवनीताचा मृदुपणा तू
कटयारीची धार तू
अन्नपूर्णेचा वास तू
नृत्यातील चपलता तू
सरगम चा साज तू
घंटेचा निनाद तू
देवघरातील प्रसन्नता तू
मुलांची गुरु तू
आई वडिलांचा आधार तू
घराचे घरपण तू
तुझ्या अस्तित्वाची चाहूल मी
आणि माझे अवघे विश्वच तू
धनंजय देशमुख, नवीन पनवेल







Be First to Comment