Press "Enter" to skip to content

कोरोना दिवाळी….

कोरोना दिवाळी….

पाहता पाहता आली दिवाळी, पाहता पाहता निघून गेली दिवाळी,
ठेवणीतल्या मोती साबणाने, चार दिवस सर्वांनी केल्या अंघोळी ll

शतकातील आगळी-वेगळी दिवाळी, संकटाच्या छायेतली ही दिवाळी,
फटाक्याचा धूर नसलेली दिवाळी, प्रदूषणाचा विचार करणारी दिवाळी,

सहा महिने बेरोजगारी नंतर ची, मन मारून साजरी केलेली ही दिवाळी ll
खूप काही सांगून गेली ही दिवाळी, खूप काही शिकवून गेली ही दिवाळी,

संक्रांत कशी उजाडेल ठाऊक नाही, मन म्हणे आनंदात होईल का होळी? ll
काहीशी अबोल, उदास गेली दिवाळी, पण आनंद घेऊन येणार ती होळी ll

चला वाट पाहू या आता त्या होळीची, साजरा करू या शिमगा ऐशा थाटात,
ऐशा बोंबा मारू कोरोनाच्या नांवाने, धूम पळेल हा जंतू नकट्यांच्या देशात ll

देऊया एक पक्के वचन स्वतःलाच, हात-पाय जरा मजबूत करूया स्वतःचे,
नरकासुराबरोबरच पुढच्या दिवाळीला, कारीट फोडायचे ह्या दुष्ट कोरोनाचे ll

डॉ. कीर्ती समुद्र, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.