Press "Enter" to skip to content

वंदन..! कोव्हिड योद्ध्यांना

वंदन..! कोव्हिड योद्ध्यांना

कोरोना राक्षसाशी लढण्या सज्ज, कोव्हीड योद्धा म्हणावे की कर्मवीर,
रुग्णसेवेला ऐसे भिडले सारे, जसे सैनिक लढती तळहाती घेऊन शीर ll

शस्त्र नसे काही हाती लढण्या, आत्मरक्षेला PPE चे तलम चिलखत,
केवळ जिद्दी ची तलवार घेऊन, अदृश्य शत्रूशी झुंज तुमची अविरत ll

सैनिका नाही उसंत काही खाण्या-पिण्या, PPE मुळे तुम्हा ते शक्य नसे,
तहान-भूक विसरून सेवा करणे, एव्हढेच फक्त तुमच्या मनात वसे ll

आम्ही वंदन करतो तुमच्या कर्तुत्वाला, आणि प्रणाम तुमच्या जिद्दीला,
म्हणून शुभेच्छासह आलो तुमच्या दारी, साज चढवाया ह्या दिवाळीला ll

दिवाळीत हे संकट विसरून जेंव्हा, सकलजन करतील आतिषबाजी,
तुम्ही मात्र करणार अखंड सेवा-यज्ञ, लावून आपुल्या प्राणाची बाजी ll

सफल होऊ दे हा सेवा-यज्ञ तुमचा, निरोगी होवू दे भारत पूर्वीसारखा,
इडा-पीडा लवकर टळो कोरोनाची, हीच नम्र प्रार्थना त्या गण नायका ll

गिरीश समुद्र, नवीन पनवेल. संपर्क : 98675 79566
98335 66120

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.