Press "Enter" to skip to content

चाहूल दवबिंदूंची

चाहूल दवबिंदूंची

भल्यापहाटे मधुबिंदुंची माळ केशरी ओघळली
टपटप सुमने अवनीवरती हिरवी सृष्टी सुखावली

सांगे वारा गोड गुपित
फुलेल आता शेवंती
पवना संगे झोके घेती
तीळ फुलांची दंगामस्ती
सप्तरंगी झिरमिर झिरमिर भुई सोनसळा पांघरली.

नील गुलाबी रंगांतुनी
सरोवरांची शोभा फुलली
हिरव्या गोल पर्णदळावर
अलिप्त कमळे तरंगली
वाऱ्यासंगे परिमळ पसरे भूमी सुगंधे दरवळली

शेतामध्ये नवान्न आले
रानपाखरे चिवचिवती
कणसे ओंब्या खाली झुकती
दान सुगीचे भू वरती
दारी लावली तोरणमाळ प्रसन्न लक्ष्मी प्रकाशली.

सुजाता खरे., नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.