Press "Enter" to skip to content

आली दिवाळी

आली दिवाळी

दिवाळीची चाहूल लागताच
मनाला येतो अनोखा हुरूप
गृहिणीच्या स्वयंपाक घराला
येते रणभूमीचे स्वरूप

दिवाळीची साफसफाई आगळी
त्याची वाटते सर्वांनाच भीती
तिलाच वाटते करावीशी
बाकी कोणाचीच नसते संमती

पण यंदा घरातला कोपरा झाडताना
मनातल्या कोपऱ्यात वाकून बघूया
घरातली धूळ साफ करताना
तिथली ही धूळ पुसूया

पहिला दिवा घरी लावताना
कोणाच्या तरी घरच्या दिव्याचे कारण बनुया
दुसरा दिवा लावताना
ज्ञानाचा दिवा पण उजळूया

तिसरा दिवा जेव्हा प्रकाश देई
कोणाच्या तरी मार्गातला प्रकाश होऊ
चवथ्या दिव्याच्या रोषणाई ने
मनाचा अंधकार दूर करू

न घाबरता न डगमगता
करू दिवाळीची पूर्वतयारी
काळजीपूर्वक जवाबदरीने
साजरी करूया दिवाळी

डॉ. शिल्पा सप्रे-गोडबोले,
नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.