Press "Enter" to skip to content

ती व तिचे आयुष्य

ती व तिचे आयुष्य

ती आयुष्य सहज जगत होती.. पण आयुष्य बनून ते तिच्याशी खेळत होते…
आयुष्याच्या वाटेवर ते तिला बरेचदा हुलकावणी देत होते…
ती शांतपणे त्याच्यावरील विश्वासाने सारे काही सहन करीत त्या आयुष्यावर मनापासून प्रचंड प्रेम करीत होती…
पण……
ते मात्र तिच्याशी दुटप्पी खेळ खेळत होते…
अखेर अचानक तिच्यातील ती त्याच्यामुळे संपली…….
आणि तिच्या त्या आयुष्याचाही शेवट झाला…
तेव्हा आयुष्यावर कधीही प्रेम करु नये……
पण आयुष्यातील शिकवलेल्या गोष्टी मात्र जरुर जपाव्यात…
आणि…..
आयुष्य बनून कोणाशीही असे खेळू नये…..

श्वेता जोशी, नवीन पनवेल.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.