तुझ्यामाझ्यात
आताशा कुठे ओळख
होत होती माझी मला
तितक्यात तुझ्या येण्याने
नेमका गोंधळ झाला ….
आता तू मात्र व्यापून
उरलायस माझ्या मनात,
मी माझी हरवलेच
आणि हसू दिसे तुझ्या डोळ्यात…
आता मला पुन्हा पुन्हा
शोधून तरी काय करू
माझे सगळच आयुष्य
तुझ्याभोवती लागलंय फिरू…
एॅड्. सायली गोखले, पनवेल







Be First to Comment