तिची आठवण
सोडून गेलीस मजला
तेंव्हा क्षण थांबले होते
इश्काच्या लाव्हारसात
कित्येक डुंबले होते
ही जखम सुगंधीत झाली
तू खंजीर चुंबीले होते
सांगू न शकलो जगाला
ते कवितेत उतरले होते
शाळेत मी जे न शिकलो
नाही ने शिकविले होते
प्रेमात मिळविले सर्व
फक्त तुला गमविले होते
शेखर अंबेकर, आदई







Be First to Comment