Press "Enter" to skip to content

करोना

करोना

लाॕक अनलाॕक सुरू झाले
तरी करोना लाॕक नाही
अंतर ठेवून समाज जपणे
विसरून आम्हा चालणार नाही

अंतर ठेवून संवाद ठेवणे
अंतरात स्नेह आहे
खर सांगतो
नाती जपणे अंतर राखून
सध्या खूप सोपे आहे

गळाभेटीत स्नेहभाव
कधीकाळी जपत होतो
दुरून डोंगर साजरे आता
असेच दिवस रोजचे आहे

हस्तांदोलन करण्यात कधी
आपुलकीचा स्पर्श होता
हाच स्पर्श धुवून आता
मनास वेदना होत आहे

काही जात्यात तर काही सुपात
करोनाची भीती उरात
म्हणून म्हणतो अनंत जनात
मास्क लावा अंतर ठेवा
हात धुवून कुटुंब जपा
नियम पाळून समाज जपा

अनंत खोत., विलेपार्ले, मुंबई

One Comment

  1. Sudarshan Sudarshan November 6, 2020

    सुंदर. 👍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.