निःशब्द आठवणी
पाऊसाची रिमझिम
वाऱ्याची झुळूक
दाटून येती
निःशब्द आठवणी
बेसावध साखरझोपेत
अलवार रेशीममिठी
दाटून येती
निःशब्द आठवणी
गवतात लपलेल्या
वळणदार पाऊलवाटा
दाटून येती
निःशब्द आठवणी
फेसळलेल्या लाटा
रेतीतल्या रेघोट्या
दाटून येती
निःशब्द आठवणी
घट्ट मिटलेल्या पापण्या
अश्रू ओघळती गाली
दाटून येती
निःशब्द आठवणी
विनया वाळिंबे, कामोठे







Be First to Comment