आजोबा
एक पान सुकलेले
एक पान गळून पडलेले
एक पान आठवणींनी शाहरलेल
एक पान पापण्या ओलवणारे
आभाळाला डोळे लावून हरवलेलं
सापडेल काही या आशेनं पाहणार…
तरीही मातीशी मायेनं बिलगलेल…
कायम चैतन्याने बहारलेलं
आजोबा नावाचं एक सोनेरी पान
बालपण समृद्ध करणारं एक पान
मणभर विसावा मिळणारं स्थान
मायेची सावली पुरवणारा
काळाच्या पुस्तकातला किमयागार
अकाली सोडून गेलेला
आमचा लाडका एक जादूगार..
श्रद्धा पाटील जाधव,
खांदा कॉलनी,पनवेल







Be First to Comment