Press "Enter" to skip to content

फक्त स्वातंत्र्य हे त्यास गोंडस नाव….!!

फक्त स्वातंत्र्य हे त्यास गोंडस नाव….!!

सत्तेच्या सिंहासनासच आहे भाव
फक्त स्वातंत्र्य हे त्यास गोंडस नाव

तेच कायदे, तेच वायदे
धनदांडग्यांचेच फक्त फायदे

उद्योगांची होतात कर्जे माफ
कष्टकर्‍यांचीच होते पुंजी साफ

सीमेवरती सैनिक देतात सदैव देशरक्षणा बलिदान
सत्तेचे भ्रष्टाचारी किडे पोखरून टाकतात बहरलेले रान

व्यवस्थेत पिचले जातात कामगार अन् कष्टकरी
शेतातच फास लावून मरतो या देशातला शेतकरी

पैसा तिथे सत्ता अन् सत्ता तिथे न्याय हेच कटू वास्तव आहे
व्यवस्थेच्या बेडीत अडकलेल्या स्वातंत्र्याचे हेच परखड सत्य आहे

व्यवस्थेतून होणार्‍या अन्यायाला नाही कुठेच ठाव
या देशा ओरबडतायत सगळे, फक्त स्वातंत्र्य हे त्यास गोंडस नावसंदिप तांबे, मुंबई

One Comment

  1. श्रीकृष्ण श्रीकृष्ण October 30, 2020

    खुप छान …आणि वास्तविक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.