कुठे
कुठे सांजवारा नदीचा किनारा
कुठे आकाशनाद नितळ युगाचा
कुठे चालणारा जनांचाच ताफा
कुठे बावरा हा मनीचा शहारा
कुठे निःशब्द मुका हासणारा
कुठे बोलणारा घेतसे आसरा
कुठे आपल्या अंतरांचा किनारा
कुठे नक्षीस देई आकार भोवरा
कुठे सांगणारा शब्द भावनांचा
कुठे मोकळा श्वास होई जिवाचा
स्वानंद मराठे, पुणे






Be First to Comment