पहिला पाऊस
पाऊस ओला पांघरून आला हिरवा शेला ,
पाऊस बेधुंद पसरावी मृदगंध बरसती सुगंध,
पाऊस बेभान हरपून भानपेरतो चैतन्याचे दान,
पाऊस पहिला सृष्टीस बिलगला हिरव्या मृगातला ,
पाऊस चैतन्य ओलीचिंब करून सुखावतो तनमन , पाऊस तान, जागवी रान पान अन पान ,
पाऊस टीप टीप मरगळ रिपरीप आडोशाला गपचिप. पाऊस खोडशाळ इंद्रधनूची माळ रंगीत आभाळ
पाऊस संगीताचे पडसाद ऊनसावलीचा वाद
पाऊस कविता दूडू दुडू सरिता वृक्षवल्ली अमृता ,
पाऊस खुळा हिरवा मळा पाखरांचा गळा
पाऊस लपंडाव मुसळधार घाव प्रेमाचे गाव
पाऊस भरलेला स्मृतींनी भारलेला ओंजळीत धरलेला पाऊस साठवण ओली आठवण रिझवतो तनमन.
पाऊस चतुर आठवणींना पूर सुखदुःखाचा सुर
पाऊस वेंधळा श्वासात मोकळा स्वरांच्या रंगकळा.
पाऊस कथा चैतन्य दाता भिजे डोंगरमाथा.
पाऊस ओला पांघरूनी आला हिरवा शेला
पूर्णिमा शिंदे, मुंबई






Be First to Comment