Press "Enter" to skip to content

आली ग अंबाबाई


मखमली गालीच्यावरी सुखी संसारी शीतला
चांदण्यांचा स्नेहल शिडकावा
सकल जनांना लाभ़ो सुखद गारवा
दु:खाच्या संकटाच्या
महासागरातून
नेशील पैलतीरा
सुखाच्या पाचुच्या नावा
अर्पण तुला सुगंधी मरवा
हे माता वैष्णवा…

आली आली गं अंबाबाई
नेसून हिरवी साडी हिरवी चोळी
लेवून मळवट भाळी
अलंकार लेवून बसली सिंहासनी
सुभग हसरा चेहरा
फुलांची आरास
अखंड नंदादीपाचा मंद प्रकाश सकल भक्तजनांना
भक्तीचा संदेश देऊनी आली गं अंबाबाई…..


मालती तळणीकर, नागपूर

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.