स्त्री महिमा
माता तू भगिनी तू,
सखी अन् सहचारिणी तू,
कर्तव्यदक्ष अन् कर्तव्यनिष्ठ तू,
‘स्व’ विसरुनी संसारी झटतेस तू,
पतीच्या उत्कर्षात तू,
लेकरांच्या संस्कारात ही तू,
वात्सल्य ममतेने बांधूनी
मनापासूनी सर्वाना जपतेस तू,
आवड, छंद, विसरुनी
सर्वांना मात्र उंच भरारी देतेस तू,
आयुष्याचा उतरणीला ,
छंदात मन रमवतेस तू,
सुसंस्कृत अन् संस्कारी तू,
आचरणातून आदर्श देतेस तू,
संकटातूनी मार्ग काढूनी
खरी धर्मपरायणी असशी तू,
आईची सावली अन् पित्याचा स्वाभिमान तू,
भावाची छाया अन् बहिणीची सखी तू,
घरच्यांच्या सुखासाठी
मनाला मुरड घालतेस तू,
रूढी, उत्सव, सण पाळूनी,
प्रत्येकात हिरीरीने भाग घेतेस तू,
किती वर्णावी तुझी महती मी
स्त्री जन्मा तुझी ही कहाणी,
तुझी ही कहाणी.
नयना पेंढारकर, नवीन पनवेल






Be First to Comment