सिटी बेल लाइव्ह / काव्य कट्टा
दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषविलेले मराठवाड्याचे शिल्पकार मा. शंकरराव चव्हाण यांची जन्मशताब्दी निमित्ताने काव्य सुमनांजली
।। आमचे भगीरथ ।।
मराठवाड्यातील लोकांची
भागविली ज्यांनी तहान
अविरत समाजकार्यामुळे
नेहमीच आहेत ते महान
पैठण आहे त्यांची जन्मभूमी
नांदेड जिल्हा आहे कर्मभूमी
अनेक वेळा मंत्रिपद भूषविले
त्यांच्या योजना आल्या कामी
जायकवाडी धरणामुळे
आपला पाणी प्रश्न सुटला
विष्णूपुरीच्या जलाशयाने
नांदेडचा सिंचनाचा प्रश्न मिटला
मराठवाडा मुक्तीसंग्रामच्या लढ्यात
त्यांनी दिले महत्वपूर्ण योगदान
जनता विसरले नाही त्यांचे कार्य
निवडून आणले देऊन भरघोस मतदान
गरिबांच्या लेकरांसाठी त्यांनी
केली शाळा विद्यालयाची सोय
कारखाने उघडून रोजगार दिले
दूर केली अनेकांची गैरसोय
पाटबंधारे, वीज व कृषीविभागातून
देशाचे झाले होते ते केंद्रीय मंत्री
राज्याच्या विकासात सिंहाचा वाटा
म्हणूनच दोन वेळा झाले ते मुख्यमंत्री
त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज
मराठवाडा सुजलाम दिसतो
लोकांच्या कल्याणासाठी आता
कोणता नेता विचार करतो
ग्रामीण भागातील जनता त्यांना
आज ही मानते देवासमान
अनेकांच्या उपयोगी पडून
त्यांनी हृदयात मिळविले स्थान
स्वामी रामानंद तीर्थ त्यांचे राजकीय गुरू
उमरखेडातून राजकारण झाले सुरू
त्यांनी दाखविलेली वाट धरू
त्यांच्या नावाचा जयजयकार करू
शंकरराव चव्हाण साहेबांची
आज आहे शंभरावी जयंती
कोटी कोटी प्रणाम भगीरथाना
त्यांच्या कार्याची पसरू दे कीर्ती
- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769






Be First to Comment