“स्त्री शक्ती”
नऊ दिवस नऊ रंग लेवूनी
जागवते अपुल्या शक्तीसी
सांगून चार युक्तीच्या गोष्टी
पाठविते पुरुषास सीमोल्लंघनासी
विसरावयास सांगून वादविवाद
सांगते प्रेमेभेटावे गोतावळ्यास
लुटावयास देई सोने सुविचारांचे
साधण्या हित अवघ्या प्रपंचाचे
वीत – दोनवीत बांधाचे भांडण
गृहकलहासी देउ म्हणे मूठमाती
प्रेमे-आलिंगणाची सांगून महती
दावे बळ एकजुटीचे ती शक्ती
नऊ दिवस जागर त्या नवशक्तिंचा
ठेवते उपवास या नऊ दिवसांचा
फुकूंन घागर जणू प्राण फुकंते
नवचैतन्याचे चराचरात या सृष्टीच्या
धनंजय देशमुख, नवीन पनवेल






Be First to Comment