झेंडूचे फूल
बाल्कनीतल्या कुंडीत आलं झेंडूचं एक फुल सुरेख
सारखं घरात डोकावतय,जणू म्हणतय तुमच्यातलाच मी एक।।
सणवार,उत्सव सारे तुम्हाला आवडती फार
ह्या सर्व कार्यांमध्ये माझ्यावरच तुमची मदार
सणवार,उत्सव वा असो लगीन घाई
प्रत्येक कार्यात माझी आठवण तुम्हाला होतेच की नाही?
गणपती, दिवाळी, नवरात्र वा असो कुठलेही शुभकारण
दाराला मात्र झेंडूच्याच फुलांचे तोरण
गुलाबराजा असो, रात्रीची राणी असो
वा असो कुठलाही सुगंध महान
पण नवरात्र्यातल्या देवीसाठी असतो झेंडूचाच मान।।
सौ. प्रतिभा शेवडे, दादर






Be First to Comment