Press "Enter" to skip to content

पायवाट

पायवाट

पायवाटेने चालत असता भास तुझाच होत असतो
मेंढराच्या कळपापुढे तुलाच मी पाहत असतो

निळ्याशार आभाळातून सूर्य प्रखर डोकावतो
मार्गाच्या किनार्यासही गर्द तरू उभा असतो

पक्षांच्याही थव्यासवे विचार तुझाच उडत असतो
हातातल्या काठीलाही तुझाच भास होत असतो

क्रमण करतो तसाच तेव्हा तुलाच तिथे शोधत असतो
सांजावताना वाट तुझी चंद्रासवे पाहत असतो

स्वानंद नंदकुमार मराठे, पुणे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.