एक नवं पाऊल
एक नवं पाऊल उचलताना
मीच जरा माझ्या मनाशी हसले
मनाला नव्याने समजावताना
माझीच मी मला सहजी कळले।
स्वप्नांचे हे अंगण सजवताना
माझ्या मी मध्ये नवे रंग भरले
यश शिखरे निकट पहाताना
विचारी प्रयत्नांचे साज सजले ।
ध्येयाच्याच वाटेवर चालताना
पुन्हा एकदा मी सुखाने भारले
एक नवं पाऊल उचलताना
मीच नव्या वळणावर वळले।
अदिती गोखले, नवीन पनवेल







Be First to Comment